चोरटे सीसीटिव्हीत कैद; गुन्हा दाखल
⚡सावंतवाडी ता.०६-: येथील बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्याने दीड लाखाची रोकड लंपास केली आहे. ही घटना मळेवाड-माळकरटेंब येथे घडली. दरम्यान यात दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याप्रकरणी अज्ञात दोन चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
