रेकोबा हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

⚡मालवण ता.०६-: महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वायरी येथील श्री रेकोबा हायस्कूलचा विद्यार्थी वेद प्रवीण कुबल याला जिल्हास्तरीय ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. त्याचा जिल्ह्यात २४ वा क्रमांक आला असून त्याला २४८ गुण मिळाले आहेत.

या शिष्यवृत्ती परीक्षेत रेकोबा हायस्कूलचा निकाल ५० टक्के लागला आहे. विघ्नेश सुनील मेस्त्री याला १८२ गुण, सिया गणेश परब १६४ गुण, रागिनी प्यारेलाल निषाद १२८ गुण मिळाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक श्री. कुबल यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी, स्थानिक समिती पदाधिकारी, पालक शिक्षक संघ, मुख्याध्यापिका सौ. शिंदोळकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page