⚡मालवण ता.०६-: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ यांचा श्री स्वामी समर्थ महाराज पालखी व पादुका दर्शन सोहळा आचरा येथे शनिवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायं. ४. वा. या वेळेत आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी १० वा. आचरा तिठा येथुन पालखी / पादुका दर्शन सोहळा मिरवणूकिस प्रारंभ सकाळी ११.३० वा. पालखीचे कार्यक्रम स्थळी (आचरा वरचीवाडी आदर्श नगर, पटेल सॉ-मिल नजीक, श्री. सुनिल खरात यांच्या निवासस्थाना शेजारील पटांगणात) आगमन व स्वागत, सकाळी ११.४५ वा. पालखी / पादुका दर्शन सोहळा व आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. महाआरती आदी कार्यक्रम होणार आहेत. हे कार्यक्रम आचरा वरचीवाडी आदर्श नगर, पटेल सॉ-मिल नजीक, श्री. सुनिल खरात यांच्या निवासस्थाना शेजारील पटांगण येथे होणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ महाराज उत्सव समिती आचरा चे अध्यक्ष सुनील खरात, सचिव सूर्यकांत राणे, सहसचिव दाजी गावकर, खजिनदार सुरज जोशी तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.
आचरा येथे स्वामी समर्थ पालखी व पादुका दर्शन सोहळा
