सिल्ल्लोड येथील अभ्यास दौऱ्यात मालवणातील शेतकरी सहभागी

⚡मालवण ता.०६-: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, मालवण तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना अर्थात UNDP-GCF अंतर्गत शेतकरी अभ्यास दौरा औरंगाबाद सिल्लोड येथे आयोजित केला आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथून हा दौरा सुरू झाला आहे. तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यात औरंगाबाद सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पाहणे, राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत विविध उपक्रमांची पाहणी व माहिती घेणे, प्रगत शेतकरी यांना भेटी, सुधारित तंत्रज्ञानाची माहिती घेणे, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल उभारणी, विविध प्रकारची प्रात्यक्षिके, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग, शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच विविध विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा, या उद्देशाने शेतकरी अभ्यास दौरा आयोजन करण्यात आला आहे. यात तालुक्यातील ४५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी कार्यालयातर्फे असून UNDP-GCF यांच्या अर्थसाह्याने आयोजित केला आहे. दौऱ्यामध्ये बदनापूर कडधान्य संशोधन केंद्र येथील विविध उपक्रमांची माहिती घेतली जाणार आहे. परतीच्या प्रवासात कोल्हापूर कणेरी मठ येथील सेंद्रिय शेतीच्या उपक्रमाची माहिती घेणे, अशा विविध उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांना या दौऱ्यात होणार आहे. इतर शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page