मच्छीमारांनी मानले आम. वैभव नाईक यांचे आभार

⚡मालवण ता.०६-: राज्याच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील यंत्रनौकाधारक मच्छीमारांच्या प्रलंबित डिझेल परताव्याच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधल्याबद्दल मालवण दांडी आवारवाडी येथील श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेतर्फे आमदार वैभव नाईक यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी संस्थाध्यक्ष जगदिश खराडे, सचिव सतेजा वायंगणकर, संचालक दिलीप पराडकर, अन्वय प्रभू रश्मीन रोगे, उद्धव ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, सन्मेश परब, तपस्वी मयेकर, महेश जावकर, सिद्धेश मांजरेकर आदी उपस्थित होते. शासनदरबारी प्रलंबित डिझेल परतावा लवकरात लवकर प्राप्त व्हावा, यासाठी काही दिवसांपूर्वी रामेश्वर मच्छीमार संस्थेने मत्स्य विभागाला निवेदन सादर केले होते. त्यानंतर लगेचच नाईक यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मत्स्यविकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर देताना, डिझेल परताव्यासाठी गेल्या सात वर्षांत जेवढी रक्कम दिली नसेल, त्यापेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे, असे स्पष्ट केले होते.

You cannot copy content of this page