उभादांडा स्कूलचा दिपेश वराडकर तालुक्यात दुसरा

⚡वेंगुर्ला ता.०५-: महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे मार्फत घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवीतील दिपेश जयराम वराडकर याने ग्रामीण सर्वसाधारण गटातून वेंगुर्ला तालुक्यातून दुसरा येण्याचा मान मिळवित शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. दिपेश याला मुख्याध्यापक उमेश वाळवेकर व सर्व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले.


त्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, चेअरमन विरेंद्र कामतआडारकर, सचिव रमेश नरसुले व कार्यकारिणी सदस्य यांनी अभिनंदन केले.
फोटोओळी – शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात दुसरा आलेला दिपेश वराडकर याचे स्कूलतर्फे अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page