शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रा प सदस्य काणेकर यांची मागणी
बांदा/प्रतिनिधी
गतवर्षी एअरटेल कंपनीने केबल खोदाई केल्याने बांदा पाटो पूल ते मच्छिमार्केट हा रस्ता उखडला गेला आहे. त्यामुळे येथील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून रहदारीसाठी योग्य बनवावा अशी मागणी बांदा
ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंता यांना सादर केले आहे. गतावर्षी मे महिन्यात वरील रस्त्यावर खासगी मोबाईल कंपनीने केबल टाकताना पूर्ण रस्त्याची नासधूस केली आहे. त्याची नुकसान भरपाईची रक्कम आपल्या खात्याकडे जमा केली आहे. या रस्त्याने लोकांना प्रवास करताना त्रास होत आहे. या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता वाहतुकीस योग्य करून द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
यावेळी निखिल मयेकर, ओंकार नाडकर्णी उपस्थित होते.
