⚡वेंगुर्ला ता.०५-: बी.के.सी.असोसिएशन, मुंबई पुरस्कृत व कलावलय वेंगुर्ला आयोजित स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ७ व ८ जानेवारी रोजी मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभाभगृह कॅम्प-वेंगुर्ला येथे होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन गोवा येथील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते देवीदास आमोणकर यांच्या हस्ते व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून एकांकिका स्पर्धेला प्रारभ होईल. यात प्रोइव्हेंटस्-मुंबई (लाडाची लेक), रंगवेडे, मुंबई (फेक ऑफ), ‘ढ‘ मंडळी-पिगुळी (वाल्मिकी), दुपारी २ ते ४ विश्रांती, सायंकाळी ४ पासून समांतर-सांगली (आधे-अधुरे), बहुरुपी नाट्यसंस्था-डोंबिवली (वारसो), इंद्रधनु रंगमंच-बोरिवली (सुसाईड वडी), राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय-इस्लापूर (तुम्ही), वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान-कणकवली (स्वगत स्वगते) यांचा समावेश आहे. रविवार दि.८ रोजी सकाळी १० वाजल्यापासून विवेकानंद कॉलेज-कोल्हापूर (चफी), फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिग-डोंबिवली (नॉट ओन्ली जिजाऊ), वक्रतुंड थिएटर-नेरुर (मधुमाया), कलासक्त-मुंबई (ओल्या भिती), दुपारी २ ते ४ विश्रांती, सायंकाळी ४ वाजल्यापासून रसिक रंगभूमी-रत्नागिरी (एल ए नादान), गायन समाज देवल क्लब-कोल्हापूर (व्हिडीओ), आस्था-सोलापूर (साक्ष), चौकट क्रिएशन-रत्नागिरी (संगीत रंगमंच), डी.डी.शिदे सरकार कॉलेज-कोल्हापूर (श्री श्री १०८ दगड) आदी एकांकिका सादर होणार आहेत. एकांकिकेसाठी प्रवेश विनामूल्य प्रवेश जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.
