⚡वैभववाडी ता.०३-: मौंदे बौध्दवाडी येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व प्रवेशद्वाराचे उद्दघाटन वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाचे ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मौंदे गावचे सरपंच जोत्स्ना मोरे, तालुका संघाचे सरचिटणीस रवींद्र पवार, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, उपाध्यक्ष संतोष कदम,राजेंद्र कुसूरकर ,सहसचिव शरद कांबळे, हेत सरपंच कांचन कांबळे, कोळपे सरपंच सुनिल कांबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाराम कांबळे, प्रकाश कांबळे, मौंदे मुंबई शाखेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे , आदि उपस्थित होते.
भिमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून हा उद्दघाटन सोहळा करण्यात आला. प्रवेशद्वार व चौक उभारणी प्रकाश कांबळे व राजेंद्र कांबळे यांनी आपल्या आईवडील अनुसया कांबळे व रत्नू कांबळे यांच्या स्मरणार्थ केली आहे. मंडळातील सर्व पदाधिकारी, महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित हेत सरपंच कांचन कांबळे व कोळपे सरपंच सुनिल कांबळे व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार माजी सरपंच अनंत कांबळे यांनी मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व प्रवेशद्वाराचे भास्कर जाधव यांच्या हस्ते उदघाटन
