नूतन सरपंच, उपसरपंच यांचा करण्यात आला सत्कार
⚡वैभववाडी ता.०३-: क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जयंती वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महीला मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्यसाधून समाजातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विचारमंचावर ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव, महिला अध्यक्ष तथा माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, सचिव रविंद्र पवार, आदी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत तालुक्यातील बौध्द समाजातील सरपंच,उपसरपंच व सदस्यपदी निवडूण आलेल्यांचा संघाच्या पदाधिका-यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
साविञीबाई फुले यांच्यामुळेच स्ञीयांना शिक्षणाची दारे उघडी झाली. आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांच्या एक पाऊल पुढे स्ञीया आहेत. हे उपकार ज्योतीबा व साविञीबाईंचे असल्याची कृतज्ञता व्यक्त करत त्यांना अभिवादन केले. यावेळी मनस्वी कांबळे, स्मिता पवार, उर्मिला जाधव, शारदा तांबे, जागृती कांबळे, आखवणे भोम सरपंच आर्या कांबळे, राजेश्री पेडणेकर, संध्या जावडेकर, सुहासिनी पेडणेकर, अर्चना जंगम यांनी साविञीबाईंना मनोगत व गीतांमधून अभिवादन केले. यावेळी राजेंद्र कुसूरकर, संजय जंगम, मंगेश कांबळे, धोंडीराम तांबे, चंद्रकांत जाधव, श्री पेडणेकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूञसंचलन शरद कांबळे व उर्मिला जाधव यांनी केले.
चौकट-
करुळ सरपंचपदी पञकार नरेंद्र कोलते व नावळे ग्रामपंचायत सदस्यपदी पञकार संजय शेळके निवडूण आले आहेत. त्यांचाही यावेळी संघाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.
