एप्रिल महिन्यात कोकणात येणार यात्रा;अर्चना घारे परब यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.०३-: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यातील वाढत्या महागाईच्या विरोधात व वाढत्या बेरोजगारी विरोधात ‘जनजागर यात्रा जागर सावित्रीच्या लेकींचा ‘ या यात्रेचे आयोजन प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून याचा शुभारंभ ४ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ही यात्रा एप्रिल महिन्यात कोकणात येणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी दिली.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे नमूद करण्यात आले की देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात महिला धोरण राबविले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिले, वारसा हक्कात मुलींच्या नावाची नोंद, संरक्षण दल पोलीस दलात देखील मुलींचा सहभाग झाला केवळ शरद पवार यांच्या दूर दृष्टीच्या नेतृत्वामुळे तमाम महिलांना सन्मान प्राप्त करून दिल्याबद्दल याच कार्यक्रमात खा. श्री शरद पवार यांना सन्मान पत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे ही यावेळी घारे परब यांना सांगितले.
दरम्यान हा कार्यक्रम संध्याकाळी ४.०० वाजाता, डेक्कन, पुणे येथील हॉटेल सेंटर पार्क येथे या आयोजन करण्यात आल्याचे ही अर्चना घारे परब यांनी सांगितले.
