१९ वर्षाखालील मुलींच्या लेदर बॉल क्रिकेटसाठी टोपीवालाच्या संघाची राज्यस्तरासाठी निवड

⚡मालवण ता.०३-: मालवण टोपीवाला हायस्कुल ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्ष खालील मुलींचा संघ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरला आहे. या संघाच्या प्रवास व अन्य खर्चासाठी मालवण भाजप महिला कार्यकारिणीच्या वतीने आर्थिक मदत कर्णधार अनुष्का आंबेरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

मालवण भाजप कार्यालय येथे महिला आघाडी तालुकाध्यक्षा पूजा करलकर यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी चारुशीला आचरेकर, पूजा सरकारे, प्रिया कांबळी, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, गणेश कुशे, महेश सारंग, प्रमोद करलकर, ललित चव्हाण, बाळू मालवणकर, प्रशिक्षक सुशील शेडगे आदी उपस्थित होते.

मुलींच्या या संघाने विनर्स स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून प्रशिक्षण संदीप पेडणेकर,
सुशील शेडगे, ज्ञानेश केळुसकर, विल्सन फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा स्तर, कोल्हापूर विभाग स्तर याठिकाणी विजय संपादन करत हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. लवकरच राज्यफेरीसाठी हा संघ रवाना होणार आहे.

१९ वर्ष खालील मुलींचा संघ

अनुष्का आंबेरकर (कॅप्टन), तन्वी सरकारे, गार्गी जुवेकर (विकेटकीपर), सानिका मेस्त्री, दीक्षा मालवणकर, जानव्ही मालंडकर, भूमिका परब, ऋतुजा पोपकर, शारदा सुर्वे, संस्कृती शेडगे, सानिया आजगावकर, रिया गावडे, सानिका मांजरेकर आदींचा संघात सहभाग आहे.

You cannot copy content of this page