धुरीवाडा प्राथमिक शाळेत सावित्री फुले यांची जयंती साजरी

मालवण दि प्रतिनिधी

धुरीवाडा प्राथमिक शाळा येथे क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिन व महिला मुक्ती दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. याप्रसंगी धुरीवाडा येथील ज्येष्ठ महिला श्रीमती लक्ष्मी शंकर जोगी यांना शाळेच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापिका सायली ढोलम, सहाय्यक शिक्षिक श्वेता यादव, अंकिता धुरी, ऐश्वर्या धुरी, संग्राम कासले आदि उपस्थित होत्या. प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सायली ढोलम, श्वेता यादव, संग्राम कासले यांनी मनोगते व्यक्त केली.

You cannot copy content of this page