चर्चा असलीतरी भाजपकडे कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही;युवराज लखमराजे भोसले यांनी केले स्पष्ट
⚡सावंतवाडी ता.०३-: लोकांमध्ये जरी चर्चा असलीतरी मी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राजकारणात आलो नाही. निवडणूक लढवण्यासाठी प्रवेश केला नसून लोकांची सेवा व प्रश्न सोडवण्यासाठी आलो असल्याची स्पष्ट भूमिका युवराज लखम राजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.
दरम्यान भाजपमध्ये जरी प्रवेश केला तरी मी पक्षाकडे कोणतेही पदासाठी मागणी केली नाही. मी फक्त लोकांची सेवा करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितले ते आज येतील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
