राजवाडा येथे ५ ते ८ जानेवारीला दशावतार महोत्सव

युवराज लखमराजे भोसले यांची संकल्पना;पंचम खेमराज महाविद्यालयाचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या संकल्पनेतून श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाच्यावतीने ५ ते ८ जानेवारी या काळात सावंतवाडी – राजवाडा येथे दशावतार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.यावेळी जिल्ह्यातील सात नामवंत दशावतार कंपन्यांचे नाट्यप्रयोग राजवाडा ते सादर करण्यात येणार आहे अशी माहिती डाॅक्टर डी.एल भारमल व युवराज लखमराजे भोसले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे.

दरम्यान, हा दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करण्या मागे कलांकराना एक व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी आम्ही मी संकल्प राबवत असून दशावतार कला स्थानिक लोकांपर्यंत कशी पोहचवता येईल या उद्देशातून आम्ही दशावतार महोत्सव आयोजित केल्याचे लखमराजे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page