उद्योजक नंदकुमार घाटे यांचे आवाहन
देवगड
सहकार क्षेत्रात काम करीत असताना निस्वार्थी पणे स्वतःची पदरमोड करून काम करण्याची मानसिकता ठेवली तर निश्चितपणे यशस्वी होता येते.आजच्या युवा पिढीने सहकार क्षेत्रात सातत्य राखणेही गरजेचे आहे.असे प्रतिपादन उद्योगपती नंदकुमार घाटे यांनी कुणकेश्वर येथे बोलताना केले.
कुणकेश्वर विविध कार्य.सह.सेवा सोसा.अमृत महोत्सवी प्रारंभी सोहळ्यात ते बोलत होते .या वेळी व्यासपीठावर कुणकेश्वर सरपंच चंद्रकांत घाडी अध्यक्षा मीना बोंडाळे,उपाध्यक्ष सुहास नाणेरकर,अमृत महोत्सवी समिती अध्यक्ष तुकाराम तेली,श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे,संपदा बोंडाळे,शीतल खोत,निलेश पेडणेकर,नागेश आचरेकर,रमाकांत पेडणेकर,अजय नाणेरकर,आदी उपस्थित होते.
या निमित्ताने दिनदर्शिका प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेच्या वाटचालीतील पदाधिकारी ,कर्मचारी, हितचिंतक,यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.तुकाराम तेली यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
श्री कुणकेश्वर देवस्थान अध्यक्ष संतोष लब्दे यांनी गावच्या शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना सहकार्य करण्याची भावना जपणे गरजेचे आहे असे सांगून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणे आवश्यक आहे.असे सांगितले.सरपंच चंद्रकांत घाडी यांनीही विचार व्यक्त केले.श्रीकांत बोडाळे याने आभार मानले.
