नववर्षाचे स्वागत केले गडकिल्ल्यांचे स्वच्छ्ता करून
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा उपक्रम

बांदा ता.०२-:
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्याचे महत्व आताच्या पिढीला समजावे यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत गडकिल्ले साफसफाई व संवर्धन मोहिम राबवून करण्यात आले. संस्थेच्या या उपक्रमाचे शिवप्रेमीनी कौतुक केले आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला संस्थेमार्फत ३१ डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांच्या परिसरात काही वर्षांपासून तळीरामांकडून वाढलेले उपद्रव तसेच गडकिल्यावर घनकचऱ्याचे वाढते प्रमाण थांबवण्यासाठी गड संरक्षण व संवर्धन मोहीम हाती घेण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला. यामध्ये रांगणा गडावर (जि. कोल्हापूर) संस्थेच्या वतीने रांगणा देवी मंदिर परिसरामध्ये साफसफाई व ऐतिहासिक वास्तूच्या जपणुकीसाठी त्यावर वाढलेल्या जंगली झाडाझुडपाची तोड करून साफसफाई करण्यात आली. या मोहीमेमध्ये संस्थेचे प्रथमेश सावंत, अजिंक्य शिंदे, समीर शिर्के, प्रदिप पवार, कुणाल चव्हाण,भगवान चव्हाण, समर्थ तुळसकर यांच्यासह ग्रामस्थानीही सहभाग घेतला. पुढील वर्षी ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
फोटो :-
रांगणा गडावर साफसफाई मोहीम राबविताना कोकण कला संस्थेचे कार्यकर्ते.

You cannot copy content of this page