तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा
बांदा/प्रतिनिधी
सावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं.१ प्रशालेच्या मुलगे मोठा गट सांघिक खेळ ‘कबड्डी’ या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनू दळवी, बांदा केंद्रप्रमुख संदिप गवस, शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया सावंत, शिक्षिका श्रीमती घाडे तसेच उपाध्यक्ष, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे क्रिडा शिक्षक मनोहर गवस यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
फोटो:-
सावंतवाडी येथे विलवडे नं.१ प्रशालेच्या मुलगे मोठा गट सांघिक खेळ कबड्डी या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
