467उमेदवार मैदानी चाचणीसाठी उपस्थित सौरभ कुमार अग्रवाल
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-: चालक पदांकरीता एकुण 2 हजार 126 उमेदवारांनी अर्ज केले होते.आज 700 उमेदवारांना मैदानी चाचणी करिता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी 467 उमेदवारांनी मैदानी चाचणीला उपस्थिती लावलेली आहे, अशी माहिती पोलीस* *अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
4 जानेवारी 2023 पर्यंत 22 रिक्त पोलीस चालक पदाकरिता पोलीस मुख्यालय मैदान, सिंधुदुर्गनगरी येथे चाचणीला सुरुवात झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदाकरिता दि. 05 जानेवारी पासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
