तळगाव येथील भवानी देवीच्या गोंधळ उत्सवाला प्रारंभ

⚡मालवण ता.०१-: मालवण तालुक्यातील तळगाव राऊतवाडी येथील श्री भवानी देवीच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त आजपासून ६ जानेवारीपर्यंत भवानी मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि ३ जानेवारी रोजी सकाळी १० वा. श्री भवानी देवीचा वर्धापन दिन दुपारी १ वा. महाप्रसाद, श्री दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग, रात्री ९ वा. महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग शेषात्मज गणेश, ४ जानेवारी रोजी रात्री ८ वा. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, माड्याचीवाडी मधलीवाडी बुवा- ऋषिकेश गावडे, १० वा. स्वरसाधना संगीत भजन मंडळ, डिगस बुवा गौरेश चव्हाण यांचा भजनाचा कार्यक्रम, ५ रोजी सकाळी १० वा कुळाचा होमहवन, ६ रोजी सकाळी १० वा. भवानी माता गोंधळ प्रारंभ, रात्री ७ वा. महाप्रसाद, १० वा. गोंधळ दिवटी कार्यक्रम आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार विनायक राऊत व सर्व राऊत परिवारातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page