पायवाटेवरून धक्काबुक्की; ५ जणांवर गुन्हे दाखल

⚡मालवण ता.३१-: मालवण शहरातील एका पायवाटेवरून दोन गटात धक्काबुक्की झाल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी दोन्ही गटांकडून मालवण पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून एकूण ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मालवण शहरातील एका पायवाटेवरून दोन गटात असलेल्या वादातून आज सकाळी दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. यात महिला व पुरुषांचा समावेश होता. या बाबत दोन्ही गटांनी पोलीस स्थानकात धाव घेत परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार पोलिसांनी एका गटातील ३ व्यक्ती व दुसऱ्या गटातील २ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विनयभंग प्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे. याबाबत मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page