दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळा नंबर १ ची तालुकास्तरीय शालेय कला, क्रीडा स्पर्धेत बाजी

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुकास्तरीय शालेय बालकला किडा व ज्ञानी मी होणार या महोत्सवात शाळा दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर 1 प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या तालुकास्तरीय ज्ञानी मी होणार स्पर्धेमध्ये कु आयुष नाळे व कु वेदांत सरकटे ,यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे तर लहान गटात कबड्डी व खो-खो मुले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यांना मुख्याध्यापिका दीप्ती पाटील ,सरकडे मॅडम ,पारधेवाड सर ,सावंत मॅडम ,व कुडतळकर मॅडमचे, मार्गदर्शन लाभले विजेत्या व मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, केंद्रप्रमुख जाधव सर, शाळा व्यवस्थापन समितीचे वतीने अभिनंदन केले.

You cannot copy content of this page