नविन वर्षाच्या प्रारंभी होणार जबरदस्त कार्यालयाचे उद्घाटन

⚡वेंगुर्ला ता.३१-: सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वेंगुर्ला शहरातील राऊळवाडा येथील जबरदस्त कला क्रिडा मंडळाची रितसर नोंदणी करण्यात आली असून या मंडळाच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन नविन वर्षाचे औचित्य साधून १ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता राऊळवाडा येथे होणार आहे.

  राऊळवाडा येथील तरुण वर्गाने एकत्र येत काही वर्षांपूवी ‘जबरदस्त राऊळवाडा‘ या मंडळाची स्थापना केली होती. या मंडळामार्फत गरीब आजारी व्यक्तींना आर्थिक मदत आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन केले होते. तसेच हस्तकलेला वाव देण्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भव्यदिव्य नरकासुराची प्रतिमा बनविण्यासाठी मुलांसह युवकांना प्रोत्साहन दिले होते. दरम्यान, या मंडळाची रितसर नोंदणी केली असून मंडळाचे संफ कार्यालय असावे असाही मानस मंडळातील कार्यकर्त्यांचा होता. त्यानुसार रविवारी या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे आवाहनही करण्यात आले आहे.
You cannot copy content of this page