बांदा/प्रतिनिधी
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड अनुदानित महिला मंडळ कुडाळ संचलित कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र कुडाळ व महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद- सिंधुदुर्ग अनुदानित महिला तक्रार निवारण, समुपदेशन, मदत व सल्ला केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय माणगाव-बेनगाव येथे शालेय मुलांसाठी ‘सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श’ तसेच कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध कार्यक्रम राबवत आहे. आजकालची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की मुलांना सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श यातील फरक समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. लहान मुलांवरील अत्याचाराची, लैंगिक शोषणाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक गुन्ह्यांची सुरवात असुरक्षित स्पर्शातून होते. या अनुषंगाने कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने या शाळेतील मुलांना या शिबिराच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन सत्रात शाळेतील एकूण ६७ विद्यार्थांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी संस्थेच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, समुपदेशक समिर शिर्के, कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र कुडाळच्या समुपदेशक करिष्मा परब, महिला व बालविकास विभाग सिंधुदुर्गच्या वतीने प्रियांका बाक्रे यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक गोविंदराव साटम, प्रशांत कांबळी, सौ. प्रज्ञा गुंजाळ, चंद्रशेखर पाटील यांचे सहकार्य लाभले.
यावेळी मुलांच्या विविध शंकांचे निरसन देखील करण्यात आले.
फोटो :-
माणगाव येथे मुलांना मार्गदर्शन करताना समुपदेशक.
माणगाव बेनगाव यक्षिणी माध्यमिक विद्यालयात “सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श” कार्यक्रम संपन्न
