खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार सन्मान
⚡कणकवली ता३१-:
कणकवली तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ सोमवार २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे होणार आहे. शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
हा सत्कार समारंभ शिवसेना उपनेते तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतिश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हासंघटक सौ.नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तरी कणकवली तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, निवडणूक लढविलेले सर्व उमेदवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख
शैलेश भोगले, प्रथमेश सावंत यांनी केले आहे.
