सूची केरकर मोठ्या गटातून मधून उंचउडी क्रीडा प्रकारात द्वितीय;जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड*
*⚡सावंतवाडी : *सहदेव राऊळ :* सावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत श्री माऊली विद्या मंदिर पूर्ण प्राथमिक शाळा सातोसे नं.१ ची विद्यार्थिनी कु.सूची भिकाजी केरकर हीने मोठा गट(मुली) मधून उंच उडी या क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्रध्दा महाले, शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी पंडित, सहशिक्षक विद्याधर लाड, कुंदा कुबल तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
