टोपीवाला हायस्कुलचा ताम्रपत्र व मानपत्र वितरण कार्यक्रम ५ रोजी

⚡मालवण ता.३१-: मालवण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या एका ख्यातनाम माजी विद्यार्थ्याला स्व. डॉ. एस. एस. आजगांवकर ताम्रपत्र व हायस्कूलच्या दोन कर्तबगार माजी विद्यार्थ्यांना स्व. डॉ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र वितरित करण्याचा कार्यक्रम गुरुवार दि. ५ जानेवारी सकाळी १० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. यावेळी ताम्रपत्र डॉ. अनिल अनंत डोंगरे यांना तर मानपत्र श्री. निखिल दिगंबर सामंत व डॉ. वैभव अजित मंत्री यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. शरद महादेव परुळेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सेक्रेटरी विजय कामत व मुख्याध्यापक श्री. खानोलकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page