Headlines

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे २ जानेवारी रोजी स्नेहसंमेलन

⚡सावंतवाडी ता.३१सहदेव राऊळ- : आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचा विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवार २ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता
आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ आरोसचे अध्यक्ष रोहिदास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलन संपन्न होणार आहे.

स्नेहसंमेलनाचे उदघाटन चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या हस्ते होणार असून जि. प. शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांच्या हस्ते विज्ञान प्रयोगशाळा उदघाटन तर जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते संस्था कार्यालय उदघाटन होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता स्नेहसंमेलन उदघाटन , विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत . तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलने केले आहे.

You cannot copy content of this page