कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, उपसरपंच रवींद्र तेली यांचा सत्कार

⚡कणकवली ता.३१-: कणकवली तालुक्यातील कोंडये ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा ऋतुराज तेंडुलकर यांनी कार्यभार स्वीकारला. यासोबत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रवींद्र तेली यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सोसायटी चेअरमन अण्णा तेंडुलकर यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रा प सदस्य सुहास बिर्जे, कमलेश तिरोडकर, क्षितिजा तांबे, स्वप्नाली सावंत, अनिता गावकर, रिया तिरोडकर आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा सोसायटी चेअरमन अण्णा तेंडुलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय सावंत यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page