कोकिसरे बेळेकरवाडीतील शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी केले स्वागत

वैभववाडी प्रतिनिधी
कोकीसरे बेळेकरवाडी येथील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
प्रवेश करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये लक्ष्मण दत्तात्रय बोभाटे, प्रकाश सखाराम बोभाटे, मधुकर सखाराम बोभाटे, कृष्णा सोनू नारकर, कृष्णा यशवंत बोभाटे, चंद्रकांत शंकर बोभाटे, रमेश बाबी बेळेकर, शिवाजी गुणाजी टक्के, संदीप सदाशिव बेळेकर, रवींद्र शिवाजी टक्के, सिद्धेश मधुकर बोभाटे, नागेश लक्ष्मण बोभाटे, सखाराम धाकू बोभाटे, कोमल कृष्णा नारकर, केतन कृष्णा बोभाटे, विनायक तुकाराम बोभाटे, प्रकाश केशव सुतार, पांडुरंग केशव सुतार, शिवराम प्रकाश सुतार, नागेश सुभाष शिरावडेकर, संतोष राजाराम बेळेकर आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला,
यावेळी नासिर काझी म्हणाले, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्यांचे अभिनंदन. कोकिसरे गावाला आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भरघोस विकास निधी देण्यात आला आहे. बेळेकरवाडीतील उर्वरित कामे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण केली जातील. प्रवाहाबरोबर येण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. यापुढे वाडीच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटीबद्ध आहे असे सांगितले. यावेळी सरपंच अवधूत नारकर, प्रदीप नारकर, राजेश सरवणकर, दाजी पाटणकर व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page