वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी दत्तजन्म सोहळा संपन्न

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला शहरासह तालुक्यात ७ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्म सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. रात्रौ उशिरापर्यंत पालखी सोहळा सुरु होता.

  दत्तजयंतीच्या निमित्ताने गेले ९ दिवस वेंगुर्ला तालुक्यात ठिकठिकाणी भजन, कीर्तन, नाटक असे कार्यक्रम सुरु होते. वेंगुर्ल्यातील जुने एकमुखी दत्तमंदिर, पार्सेकर दत्तमंदिर, ख्यालगिरी स्वामी समर्थ मठ, साईबाबा मंदिर एस.टी.स्टॅण्ड, परुळेकर दत्तमंदिर, सुरंगपाणी दत्तमंदिर, साकववाडा येथील वाजंत्री दत्तमंदिर, उभादांडा येथील आई नरसुले समाधी मंदिर याठिकाणी दत्तजन्म तर उभादांडा-डिचोलकरवाडी, अणसूर, कोनी भटवाडी, वेंगुर्ला रामेश्वर मंदिर येथे दत्तजयंतीनिमित्त भजन, पालखी असे कार्यक्रम संपन्न झाले. भाविकांनी ठिकठिकाणी उपस्थित राहून श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले.
You cannot copy content of this page