⚡कणकवली ता.१०-: कणकवली तालुक्यातील सांगवे ग्रामपंचायत निवडणुकीतील सदस्य पदासाठीचे अपक्ष उमेदवार अजय सुतार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते भगवा हातात घेऊन प्रवेश केला.
बाळासाहेबांची शिवसेना कणकवली संपर्क कार्यालय कणकवली येथे अजय सुतार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.यावेळी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत,शेखर राणे,तालुका प्रमुख भूषण परुळेकर,तालुका समन्वयक सुनील पारकर आदी उपस्थित होते.
