बांदा/प्रतिनिधी
डिंगणे गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी, माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा होणार आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी मंदिरात पुजा अर्चा होऊन दर्शन, देवीची ओटी भरणे,नवस बोलणे,नवस फेडणे, त्यानंतर रात्रौ ठिक १२ वाजता देवीची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळा आरंभ होईल. पालखी सोहळा झाल्यानंतर जत्रोत्सवानिमित्त नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. रविवार दिनांक ११ रोजी सकाळी दहिकाला होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता देवीच्या प्रसादाची पावणी सुरू होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी सातेरी माऊली पंचायतन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
डिगणे सातेरी, माऊली जत्रोत्सव आज
