रोखण्यासाठी जनजागृती करणार
पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर गुन्हेगारीचे प्रमाण कमी असले तरीही सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोनच्या वापराविषयी ज्ञानात अभाव असल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना प्रत्येकाने खबरदारी कशी घ्यावी, तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज आणि अमिषांना कोणीही बळी पडू नये, यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पुढील काळात सिंधुदुर्ग सायबर सेल आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या चोरट्या दारूवाहतुकीला रोखण्यासाठी लवकरच ॲक्शन प्लान केला जाईल. त्यानुसार कार्यवाही सुरू असून त्यानुसार कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या उद्भवत असल्याने त्या बाबत नियोजनासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे तसेच जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आम्ही अलर्ट असून पोलीस कर्मचाऱ्यांन देखील याबाबतचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील जागेची व पोलीस वसाहतीची आज आपण पाहणी केली. प्रथमदर्शनी पाहता पोलीस वसाहतीतील इमारतींची दयनावस्था झाली आहे.ती सुधारण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात का या संदर्भात आपण पोलीस दल आणि वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
