⚡कणकवली ता.०९-: कलमठ-नाडकर्णी नगर
येथील रहिवासी अरविंद वामन कारेकर ( 81) यांचे शुक्रवारी आकस्मिक निधन झाले.
अरविंद कारेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये आपली सेवा बजावली होती. काही काळ त्यांनी प्रभारी गटविकास अधिकारी म्हणूनही कार्य केले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली , जावई , नातवंडे असा परिवार आहे . नाडकर्णी नगर रहिवासी संघाचे ते क्रियाशील सदस्य होते . कुडाळ येथील सुवर्ण व्यावसायिक राजू पाटणकर यांचे ते सासरे होत .
