उभाबाजार येथे एस एम मडकईकर ज्वेलर्सचा शुभारंभ

एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या आहे भव्य शोरुम

⚡सावंतवाडी ता.०९-: शहरात उभा बाजार मारुती मंदिरसमोर प्रथमच सुरू करण्यात आलेल्या “एस. एम. मडकईकर ज्वेलर्स” या १ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या भव्य शोरूमचा दिमाखदार शुभारंभ शुक्रवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला.

या उद्घाटन प्रसंगी श्यामसुंदर मडकईकर, वसुंधरा मडकईकर, विराग मडकईकर, वैष्णवी मडकईकर, पराग मडकईकर, प्रियांका मडकईकर, राजेश पनवेलकर, गुरु मठकर, राजू कारेकर, उत्तम धारगळकर, दिपाली मडकईकर आदिंसह मोठ्या संख्येने मडकईकर कुटुंबीय व नातेवाईक तसेच परिसरातील सुवर्णकार उपस्थित होते.

उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आलेल्या खास ऑफर्सचा ग्राहकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. दरम्यान, या शोरूम मध्ये ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यात आली असून ही ऑफर १८ डिसेंबर पर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे दागिने शौकिनांनी आमच्या दालनाला भेट देऊन कमीत कमी दरात दागिने खरेदी करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मडकईकर कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

या विशेष ऑफर्समध्ये ३ हजारांच ‘मंगळसुत्र’ फक्त २ हजार रूपयांत, ३ हजारांचा ‘राणी हार’ १९०० रूपयांत, ‘नेकलेस सेट’ फक्त १६०० रूपयात, ६ काकणांचा सेट १९०० रुपयात आदी किमतीत दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा आज असंख्य ग्राहकांनी लाभ घेतला. तर ही ऑफर १८ डिसेंबर २०२२ पर्यंत मर्यादित असून जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक आमच्या दालनात भेट द्यावी किंवा विराग मडकईकर ८४११९३०४३७ वैष्णवी मडकईकर ७७९६६९५४४८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page