आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत
⚡कणकवली ता.०७-: पिसेकामते फळसेवाडी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते अंकुश मारुती राणे यांनी आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्के मिळत आहेत. आमदार नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. व विकास कामांच्याबाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही. अशी ग्वाही देखील प्रवेशकर्त्यांना दिली.
यावेळी आम. नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, पिसेकामते नवनिर्वाचित सरपंच सौ.प्राजक्ता मुद्राळे, श्री.इब्राहिम शेख,श्री.सुभाष मालनकर,आनंद घाडी, पिसेकामते नवनिर्वाचित सदस्य संकेत राणे,रेश्मा चव्हाण,श्रावणी जाधव,सुहास कदम,नितीन मोहिते,काका कदम,कृष्णा घाडी,संदीप घाडी व पिसेकामते ग्रामस्थ उपस्थित होते.
