साकेडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुरेश साटम बिनविरोध

ग्रा. प. चे पाच सदस्य बिनविरोध

⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये साकेडी सरपंच पदी भाजपाचे सुरेश साटम यांची बिनविरोध निवड झाली. तर यापूर्वी छाननी दरम्यान चार सदस्य बिनविरोध झाले होते.

नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 4 नामनिर्देशन पत्र मागे घेण्यात आली. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक 1 मधून मोहम्मद जहूर शेख, सुविधा सुहास गुरव, प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रज्वल पांडुरंग वर्दम, विशाखा विश्वास राणे या बिनविरोध झाल्या. तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वसाधारण जागेवर दिगंबर विजय वालावलकर हे बिनविरोध झाले. तर सर्वसाधारण महिला या जागे करिता दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्याने एक जागा रिक्त राहिली आहे. तर अनुसूचित जाती महिला या जागे करिता मंगला विजिन जाधव व प्रेरणा प्रशांत जाधव यांच्यात लढत होणार आहे. नवनिर्वाचित सरपंच व सर्वच सदस्यांचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page