देवगड तालुका खरेदी विक्री संघाचा भात खरेदी शुभारंभ

⚡देवगड ता.०७-: देवगड तालुका खरेदी विक्री संघाच्या देवगड केंद्राचा भात खरेदी शुभारंभ संघाचे चेअरमन अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संघाचे व्हाईस चेअरमन रवींद्र तिर्लो टकर व्यवस्थापक कौस्तुभ जामसंडेकर ,कर्मचारी महेंद्र पारकर, संदीप सावंत, स्वप्निल पाटकर, देवगड भात खरेदी केंद्रप्रमुख राजेश सावंत ,पडेल भात खरेदी केंद्रप्रमुख जयवंत शिंदे ,पाटगाव भात खरेदी केंद्रप्रमुख प्रभाकर गोखले, गोडाऊन कीपर श्रीराम पाळेकर तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
संघाने देवगड केंद्रा बरोबर पडेल पाटगाव या ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू केलेली आहेत. यावर्षी भाताला शासनाने प्रतिक्विंटल २हजार ४० रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील २०९ शेतकऱ्यांची नोंदणी संघांनी केलेली आहे .तालुक्यातील सर्व नोंदणी शेतकऱ्यांनी आपल्याकडील भात नजीकच्या भात खरेदी केंद्राकडे आणून द्यावे असे आवाहन संघाचे चेअरमन अजितराव गोगटे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page