कोळोशी येथे अनंत हडपिडकर सेवानिवृत्त शुभेच्छा सोहळा संपन्न

⚡देवगड ता.०७-: माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी -हडपिड येथे नाईकपदी कार्यरत असणारे . अनंत गणपत हडपिडकर यांचा सेवानिवृत्ती पर शुभेच्छा सोहळा शालेय सभागृहात संपन्न झाला .
. अनंत गणपत हडपिडकर यांचा सेवानिवृत्ती पर शुभेच्छा सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवरांनी . अनंत हडपिडकर यांच्या कार्याचा गौरव केला या सोहळ्याला श्री .ऐनापुरे शिरगांव , .एस .पी . गर्जे , .टी. डी कांबळे , श्री . लोके, . करडे सर, श्रीम . साटम , . सुरेंद्र लांबोरे मोंड हायस्कुल , . रमेश कदम , . विश्वनाथ कदम, श्री. नागोजी खरात , कु . प्राजक्ता हडपिडकर,आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल .
यावेळी व्यासपिठावर मुंबई मंडळ सदस्य . संजय नाईक ,शाळा समिती अध्यक्ष . किशोर राणे , मुख्याध्यापक . प्रमोद लोके , सरपंच .दाजी राणे , . चंद्रकांत शिंदे , . संतोष चव्हाण , सुभाष इंदप , . शंकर राणे , शिवाजी गुरव , ग्रामविकास अधिकारी श्री . रामदास हडपिडकर आदी ,मान्यवर उपस्थित होते .
या सोहळ्यात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .किशोर राणे यांनी अनंत हडपिडकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले . यावेळी मनोगत व्यक्त करताना किशोर राणे म्हणाले की श्री .अनंत हडपिडकर यांनी गेली ३३ वर्षे प्रामाणिकपणे , व निस्वार्थीपणे सेवा बजावली असुन त्यांनी शाळेला दिलेले योगदान मोठे असुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमाचे सुंत्रसंचालन श्रीम. गर्जे यांनी केल तर आभार मुख्याध्यापक . प्रमोद लोके यांनी मानले .

You cannot copy content of this page