श्री स्वामी समर्थ मठात आज स्वाहाकार आणि रूद्र याग, मल्हारी यागाचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.०६-: श्री दत्त जयंती उत्सवनिमित्त सावंतवाडी गरड परिसरातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मठात अंखंड नाम जप यज्ञ सप्ताह १ डिसेंबर पासून सुरू झाला असून, यावेळी मठात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. आज दिनांक ६ डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार आणि रुद्र्याग/ मल्हारी याग होणार आहे.

तर उद्या दिनांक ७ डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार, बलीपूर्णाहुती त्यानंतर दुपारी १२.३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे. तर गुरुवार दिनांक ८ डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पूजन, स्थापित देवता विसर्जन आणि अंखड नाम जप यज्ञ सप्ताह ची सांगता होणार आहे. तसेच दुपारी १ ते ३ यावेळेत महाप्रसाद होणार असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page