सदस्य पदाचे १३ अर्ज बाद

सरपंच पदाचे सर्व अर्ज वैध

देवगड : प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंंचपदासाठी ११० तर सदस्यपदासाठी ४८७ सदस्य वैध ठरले.सदस्यपदासाठी दाखल झालेल्या ५०० उमेदवारी अर्जांपैकी छाननीमध्ये १३ अर्ज अवैध ठरले तर सरपंचपदाचे सर्व ११० अर्ज वैध ठरले.

देवगड तालुक्यातील एकूण ३८ ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे.सरपंचपदाच्या ३८ आणि सदस्यपदाच्या ३०२ अशा एकूण ३४० जागांसाठी निवडणूक होत आहे.सरपंचपदासाठी एकूण ११० तर सदस्यपदासाठी ५०० अर्ज दाखल झाले होते.सोमवारी उमेदवारी अर्ज छाननीमध्ये सरपंचपदाचे सर्व ११० अर्ज वैध ठरले असून सदस्य पदाच्या एकूण ५०० अर्जापैकी ४८७ अर्ज वैध ठरले आहेत अशी माहिती निवडणुक विभागाने दिली.

You cannot copy content of this page