चार ग्राम पंचायतीत सर्व सदस्य बिनविरोध
⚡वैभववाडी ता.०५-: वैभववाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्जाची छाननी सोमवारी करण्यात आली. सरपंच व सदस्य पदासाठी भरण्यात आलेले सर्व अर्ज वैद्य ठरले आहेत. १७ सरपंच पदासाठी ३७ उमेदवार असून १२५ सदस्यांसाठी १४१ उमेदवारी अर्ज आहेत. तालुक्यातील जांभवडे, उपळे, निमअरुळे, गडमठ या ग्रामपंचायती एका जागेसाठी एकास एक उमेदवारी अर्ज आल्यामुळे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर अरुळे सरपंच बिनविरोध ठरले आहेत.
उमेदवारी अर्जाच्या छाननीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून ग्रामपंचायत उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तहसिल कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी सर्व १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले आहेत.
अर्ज मागे घेण्याची मुदत ७ डिसेंबर असून त्यानंतरच निवडणूकीचे चिञ अधिक स्पष्ट होणार आहे.
