⚡कुडाळ ता.०५-: कुडाळ तालुक्यामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या छाननीमध्ये सरपंच पदासाठी आलेल्या १९८ अर्जापैकी १ अर्ज अवैद्य तर सदस्य पदासाठी १ हजार ७५ अर्जापैकी १६ अवैद्य अर्ज ठरले आहेत.
कुडाळ तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार आज उमेदवारी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होती या छाननीमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची गर्दी झाली होती या छाननीमध्ये कोणतेही उमेदवारांनी परस्पर विरोधी तक्रार घेतली नाही मात्र चुकीच्या पद्धतीने अर्ज भरणे किंवा अर्जामधील काही त्रुटी राहिल्याने काही अर्ज अवैद्य ठरले तालुक्यामध्ये सरपंच पदासाठी १९८ अर्ज आले होते यापैकी १ अर्ज अवैद्य ठरला आता १९७ अर्ज बाकी राहिले आहेत तसेच सदस्य पदासाठी १ हजार ७५ अर्ज आले होते त्यापैकी १६ अर्ज अवैध ठरले आता १ हजार ५९ अर्ज बाकी राहिलेले आहेत अर्ज मागे घेण्याची तारीख आणि चिन्ह वाटप ७ डिसेंबर रोजी कुडाळ तहसील कार्यालय येथे होणार आहे.
फोटो कुडाळ तहसील कार्यालय येथे छाननीसाठी झालेली गर्दी
