प.पू. राऊळ महाराज दत्त मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

⚡कुडाळ ता.०५-: सालाबादप्रमाणे प.पू .राऊळ महाराज पिंगुळी येथील दत्त मंदिरात बुधवार दि 7 डिसेंबर रोजी श्री दत्तात्रय जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पहाटे पाच वाजल्यापासून रात्रौ दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे पहाटे पाच ते सहा काकड आरती व भुपाळ्या सकाळी सहा ते सात श्रीची पाद्य पूजा सकाळी सात ते आठ राउळ महाराज समाधी मंदिर आणि दत्त मंदिरात अभिषेक सकाळी आठ ते दहा प.पू.विनायक अण्णामहाराज समाधी मंदिरात अभिषेक सकाळी दहा ते अकरा नामस्मरण दुपारी बारा ते एकमहाराजांची व दत्तगुरु ची आरती दुपारी एक ते तीन महाप्रसाद तीन ते पाच स्थानिक भजने सायंकाळी 5:30 ते 6:30 दत्त जन्म सोहळा सात ते आठ सांज आरती रात्रो आठ ते दहा महाराजांच्या पादुकांची व दत्तगुरूंची पालखी मिरवणूक, महाप्रसाद रात्र दहानंतर सावरेश्वर पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ आवेरे पौराणिक नाट्यप्रयोग या सर्व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री प.पू. समर्थ राऊळ महाराज सेवा ट्रस्टचे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page