Headlines

हनुमंत गडावर २५ शिवाजी महाराज स्मारक जीर्णोद्धार, तोफगाडा लोकार्पण

बांदा/प्रतिनिधी
फुकेरी (ता. दोडामार्ग) येथील शिवछत्रपतीकालीन काळातील ऐतिहासिक हनुमंत गडावर रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जीर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी २४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, जागर गोंधळ होणार आहे. २५ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन होणार आहे. त्यानंतर तोफगाडा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सर्व दुर्गसेवक, दुर्गसेविका, श्री देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ फुकेरी व फुकेरी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे. शिवप्रेमीनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन फुकेरी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page