स्थानिक निधी परीक्षा कार्यालयामार्फत ‘बांधकाम आणि ई-निविदा’ विषयावर प्रशिक्षण पूर्ण

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा कोकण विभाग यांच्यावतीने स्थानिक निधी परीक्षा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी बांधकाम आणि ई-निविदा विषयक एक दिवसीय प्रशिक्षण पूर्ण झाले.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आज झालेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन सहायक संचालक बाळासाहेब पाटील आणि प्रमुख पाहुणे सहायक संचालक संदीप पाटील यांच्या हस्ते झाले.
उद्घाटक म्हणून बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले, शासनाच्या निर्णयाचा अभ्यास असायला हवा. नवे तंत्र आणि तंत्रज्ञान विषयाचे ज्ञान आत्मसात करावे. आपल्याकडील नवी माहितीचे आदान-प्रदान करावे त्यासाठी सर्वांनी अपडेट रहावे.
प्रमुख पाहुणे संदीप पाटील म्हणाले, शासनाचा निर्णयाची योग्य अंमलबजावणी केली जातेय की नाही याबाबत दक्ष रहावे.
सांगली जिल्हा परिषद पीएमजेएसवायचे नोडल अधिकारी विनायक जाधव यांनी बांधकाम व ई-निविदा या विषयांवर सविस्तर माहिती दिली. जिल्हा लेखा परीक्षण अधिकारी पांडुरंग थोरात यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रशिक्षणास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

  • सोबत फोटो जोडला आहे.

You cannot copy content of this page