⚡कुडाळ ता.०२-: कोकण दौर्यावर आलेले मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना कुडाळ येथील चित्रकार रजनीकांत कदम यांनी रेखाटलेले सिंधुदुर्ग किल्ल्याचे विलोभनीय चित्र भेट दिले.
कोकण दौर्यावर आलेले मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे कुडाळ येथे गुरूवारी आले असता हाॅटेल लेमन ग्रास येथे चित्रकार रजनीकांत कदम यांनी ठाकरे यांची भेट घेत त्यांना सिंधुदुर्ग किल्ल्याचे चित्र भेट दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विलोभनीय रेखाटलेले चित्राचे राज ठाकरे यांनी कौतुक केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विलोभनीय पर्यटन स्थळांची चित्रकलेच्या माध्यमातून ही विशेष ओळख व्हावी या उद्देशाने चित्रकार रजनीकांत कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विलोभनीय पर्यटन स्थळांची अनेक चित्रे रेखाटली आहेत.
त्यांच्या कुंचल्यातुन साकारलेले अनेक चित्रे विविध ठिकाणी गेली आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत.
मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे ही प्रसिद्ध चित्रकार ही आहेत त्यामुळे त्यांच्या पर्यंत आपली कला पोहचावी, हा उद्देश असल्याचे रजनीकांत कदम यांनी सांगितले.
फोटो- राज ठाकरे यांना सिंधुदुर्ग किल्ल्याचे चित्र भेट देताना रजनीकांत कदम
