बिडवाडीत उद्यापासून दत्तजयंती उत्सव;६ रोजी होम मिनिस्टर स्पर्धा

⚡कणकवली ता.०२-: बिडवाडी येथील दत्तमंदिरात ३ ते ९ डिसेंबर या कालावधीत श्री दत्तजयंती उत्सव २०२२ विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

३ रोजी सकाळी ७ ते १ वा. दत्तयाग, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ वा. सुगमसंगीत, सायंकाळी ५ वा. हळदीकुंकू, रात्री १०वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा. ४ रोजी सकाळी ७ वा. श्रींची महापूजा व महाअभिषेक, दुपारी १२.३० वा. नित्य पूजाविधी व आरती, दुपारी १.३० ते ३ वा. महाप्रसाद, सायं. ४ ते ७ वा. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ७ ते १० वा. स्थानिक भजनी कलाकारांची भजने, रात्री १० वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा, ५ रोजी सकाळी ७ वा. श्रींची महापूजा व महाअभिषेक, दुपारी १२.३० वा.
महाअारती, दुपारी १.३० ते ३ वा. महाप्रसाद, सायं. ४ ते ८ वा. स्थानिक भजनी कलाकारांची भजने, रात्री रात्री ८ ते १० वा.
ह.भ.प. चिंतामनी सावंत यांचे कीर्तन, रात्री १० वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा. ६ रोजी रोजी सकाळी ७ वा. श्रींची महापूजा व
महाअभिषेक, दुपारी १२.३० वा. महाअारती, दुपारी १.३० ते ३ वा. महाप्रसाद, सायं. ४ ते ७ वा. होम मिनिस्टर स्पर्धा, रात्री ७ वा.
कीर्तन, रात्री १० वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा. ७ रोजी सकाळी ७ वा. श्रींची महापूजा व महाअभिषेक, दुपारी १२.३० वा. आरती, दुपारी १.३० ते ३ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. दत्तजन्मावर कीर्तन, सायं. ६.२० वा. श्रींचा जन्मोत्सव सोहळा, सायं. ७ वा. आरती व प्रसाद वाटप, त्यानंतर श्रींची ओटी भरण्याचा कार्यक्रम, रात्री ९ वा. स्थानिक भजनी कलाकारांची भजने, रात्री १० वा. श्रींची
पालखी प्रदक्षिणा, रात्री १ वा. लळीत कीर्तन, रात्री १.३० वा. श्री हनुमान दशावतार नाट्यमंडळ, राठीवडे यांचा महान पौराणिक नाटक होईल. ९ रोजी ७ वा. समाराधना, दुपारी १.३० ते ३ वा. महाआरती व महाप्रसाद, सायं. ४ वा. कार्यक्रमांची सांगता होईल. तरी भाविकांनी या उत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन बिडवाडी ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page