वैभववाडी तालुक्यात सरपंचपदासाठी ५१ तर सदस्य पदासाठी २१६ उमेदवारी अर्ज दाखल

वैभववाडी प्रतिनिधी
    वैभववाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शुक्रवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी १७ सरपंच पदासाठी ५१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर एकूण १२५  सदस्यांसाठी २१६  उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. गडमठ, उपळे, जांभवडे, निमअरुळे   येथे एका जागेसाठी एकच अर्ज आल्यामुळे या ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत.तर अरूळे सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे सरपंच बिनविरोध झाला आहे.
    

शुक्रवारी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी तहसिलदार कार्यालयात मोठी गर्दी केली होती. आॕनलाईन पध्दतीमध्ये अडचण येत असल्यामुळे प्रशासनाने आॕफलाईन अर्ज सादर करण्याची परवानगी दिली. त्यामुळे शेवटच्या दिवशी सर्वांची एकच धावपळ सुरु होती.
     वैभववाडी तालूक्यातील १७ ग्रामपंचायतीची निवडणूक १८ डिसेंबरला होत आहे. ग्रामपंचायत निहाय सरपंच व सदस्य पदासाठी आलेले अर्ज खालीलप्रमाणे.
नावळे ग्रामपंचायत सरपंच सर्वसाधारण महिलांसाठी असून यासाठी ३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर सदस्य पदाच्या ७ जागां पैकी दोन जागा बिनविरोध तर ५ सदस्यांसाठी  १०  अर्ज दाखल झाले आहेत.

करुळ ग्रामपंचायत सरपंच सर्वसाधरण असून ४ अर्ज दाखल झाले आहेत. तर ९ सदस्यांसाठी १३ अर्ज दाखल झाले आहेत.

ग्रामपंचायत गडमठ सरपंच नामप्र महिला राखीव असून सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे सरपंच बिनविरोध होणार आहे. तर ७ सदस्यांसाठी ५ अर्ज दाखल झाले आहेत. तर दोन जागा त्या प्रवर्गातील उमेदवारी अर्ज आला नसल्यामुळे रिक्त राहिल्या आहेत.

ग्रामपंचायत जांभवडे सरपंच सर्वसाधारण महिला असून एकच अर्ज आल्यामुळे बिनविरोध झाली आहे. तर सात जागांसाठी ७ अर्जच आल्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध ठरली आहे.

  • ग्रामपंचायत उपळे सरपंचपद सर्वसाधारण महिला राखीव असून एकच अर्ज आल्यामुळे सरपंच बिनविरोध तर सात सदस्यांसाठी ७ अर्ज आल्यामुळे सदस्य निवडही बिनविरोध झाली आहे.
  • ग्रामपंचायत तिथवली सरपंच सर्वसाधारण महिलांसाठी असून सरपंच पदासाठी ३ अर्ज दाखल झाले आहेत. तर ७ सदस्यांसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
  • नानिवडे सरपंच सर्वसाधारण महिला राखीव असून सरपंच पदासाठी २ अर्ज दाखल झाले आहेत. तर ७ सदस्यांसाठी १० अर्ज दाखल झाले आहेत.
  • ग्रामपंचायत हेत सरपंच अनु जाती महिला राखीव २ अर्ज दाखल तर ७ जागांसाठी ९ अर्ज दाखल.
  • ग्रामपंचायत नेर्ले सरपंच पद नामप्र महिला राखीव २. अर्ज दाखल. तर ७ सदस्यांसाठी ११ अर्ज.
  • तिरवडे तर्फ खारेपाटण सरपंच सर्वसाधारण असून ४ अर्ज दाखल. तर ७ सदस्यांसाठी 15 अर्ज.
    ग्रामपंचायत नापणे सरपंच नामाप्रसाठी राखीव ५ अर्ज तर सात सदस्यांसाठी २० अर्ज.
    ग्रामपंचायत अरुळे सरपंच सर्वसाधारण महिला १ अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे सरपंच बिनविरोध निवड झाला आहे. तर सात सदस्यांसाठी ९ अर्ज दाखल.

ग्रामपंचायत कोळपे (सरपंच सर्वसाधारण )६ अर्ज दाखल तर ९ जागांसाठी २२ अर्ज,
ग्रामपंचायत सडुरे शिराळे सरपंच सर्वसाधारण असून ६.अर्ज दाखल झाले आहेत, तर ७ सदस्यांसाठी १० अर्ज.
ग्रामपंचायत निमअरुळे सरपंच पद नामप्र राखीव असून १.अर्ज दाखल झाल्यामुळे सरपंच बिनविरोध निवड होणार आहे. तर ७.जागेसाठी ६.अर्ज दाखल झाल्यामूळे ही ग्रामपंचायत बिनविरोध ठरली आहे.

ग्रामपंचायत उंबर्डे सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी असून ७ अर्ज दाखल झाले आहेत.तर ९ सदस्यांसाठी ३१ अर्ज दाखल झाले आहेत.
ग्रामपंचायत कुर्ली सरपंच नामप्र महिलांसाठी २ अर्ज दाखल तर ७ सदस्यांसाठी १६ अर्ज दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page